CAA विरोधात काँग्रेसचं डोअर टू डोअर कँम्पेन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 12, 2020

CAA विरोधात काँग्रेसचं डोअर टू डोअर कँम्पेन

https://ift.tt/2FJmel3
मुंबई: भाजपनं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ रॅलीच्या माध्यमातून लोकसंपर्काला सुरुवात केलेली असतानाच काँग्रेसनेही आता डोअर टू डोअर जाऊन सीएएविरोधात पत्रकं वाटण्याचा निर्णय घेतला आहे. आणि एनआरसी कायदा कसा असंवैधानिक असून धर्मनिरपेक्षतेच्या मूल्ल्यांची कशी पायमल्ली करण्यात आलीय, हे दाखवून देण्याचं काम या पत्रकातून करणार आहे. तसेच येत्या २४ जानेवारी रोजी परळच्या कामगार मैदानात सीएएच्या विरोधात काँग्रेसने महारॅलीचंही आयोजन केल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसने शुक्रवारी मुंबईत या संदर्भात एक ट्रेनिंग सेशन आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी वकील मिहीर देसाई, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला, वर्षा विद्या विलास, सलीम अलवारे, एमए खालिद, बॉम्बे कॅथलिक सभेचे डॉल्फिन डिसूजा, अमोल आणि जतीन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सीएए आणि एनआरसीच्या कायदेशीर आणि तांत्रिक बाजूंसह या कायद्यांचा देशावर होणाऱ्या दूरगामी परिणामांची माहिती जनतेला देण्यावर सर्वच वक्तत्यांनी यावेळी भर दिला. सीएए कायद्याच्या दुष्परिणामांची लोकांना माहिती व्हावी यासाठी पक्षाकडून लवकरच एक अभियान राबवलं जाणार आहे, असं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितलं. तर सीएएबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी म्हणून ब्लॉक स्तरीय डोअर टू डोअर कँम्पेन राबवलं जाणार असल्याचं काँग्रेसचे शहर पदाधिकारी भूषण पाटील यांनी सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यापूर्वी सर्वपक्षांना सोबत घेऊन 'आम्ही भारताचे लोक' नावाचा फ्रंट तयार केला होता. या फ्रंटच्यावतीनं गेल्या महिन्यात ऑगस्ट क्रांती मैदानात एका विशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सीएए आणि एनआरसीबाबत बरीच चुकीची माहिती पसरवली जात आहे. खरे तर हा कायदा भेदभाव करणारा आहे. या कायद्यामुळे देशात दोन गट निर्माण झाले आहेत. हा कायदा म्हणजे भारतीय संविधानावरील हल्लाच आहे. याच मुद्द्यांबाबत ट्रेनिंग सेशनमध्ये विस्ताराने माहिती दिली जाईल. त्यानंतर आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांमध्ये जाऊन जागरुकता निर्माण करण्याचं काम करतील, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.