
पुणे: खेड-शिवापूर टोलनाका हटवण्यासाठी आज पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर प्रचंड रास्तारोको केला आहे. त्यामुळे या टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार या सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, चिघळू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.