'जामिया'तल्या हिंसाचाराचा धक्कादायक व्हिडिओ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 16, 2020

'जामिया'तल्या हिंसाचाराचा धक्कादायक व्हिडिओ

https://ift.tt/3bJ7PnF
नवी दिल्ली : दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांना विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराचा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ जामिया कॉर्डिनेशन समितीनं प्रसिद्ध केलाय. जामिया विद्यापीठामधल्या वाचनकक्षातील हा व्हिडिओ असल्याचा दावा या समितीनं केलाय. वाचनालयातील सीसीटीव्ही फुटेजचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय. परंतु, अद्याप या व्हिडिओवर अधिकृतरित्या पृष्टी झालेली नाही. 'जुन्या रिडींग हॉलच्या पहिल्या मजल्यावर एमए / एम फिल सेक्शनमध्ये १५ डिसेंबर २०१९ रोजी पोलिसांच्या क्रूरतेचा एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज. दिल्ली पोलिसांनी लाज बाळगावी' असं ट्विट करत जामिया कॉर्डिनेशन समितीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांनाही टॅग करण्यात आलंय. हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर थोड्याच वेळात तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांवर हिंसेचा आरोप करण्यात आला होता. आंदोलकांनी रस्त्यावर जोरदार हंगामा केला तसंच पोलिसांवर आणि गाड्यांवर दगडफेक केल्याचाही आरोप करण्यात आला.