नगरमधील भाविकांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 24, 2020

नगरमधील भाविकांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

https://ift.tt/2T6AgDG
वडोदराः अहमदनगर जिल्ह्यातील चार भाविकांचा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात रस्ते अपघातात रविवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुबेर भंडारी मंदिरात दर्शन घेऊन कारने परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे समजते. नंदकिशोर संपत, किशोर कोल्हे, गोरख घोरपडे आणि प्रवीण शिरसाठ अशी अपघात मृत झालेल्यांची नावे आहेत. हे चार भाविक शनिवारी गुजरातला गेले होते. कुबेर भंडारी मंदिरात दर्शन घेऊन परतात असताना अपघात घडला. रविवारी पहाटे ५.३०च्या सुमारास ट्रकला ऑव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या ट्रककडे दुर्लक्ष झाल्याने अपघात घडला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.