BSNL चा 'हा' सर्वात चांगला प्री-पेड डेटा प्लान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 24, 2020

BSNL चा 'हा' सर्वात चांगला प्री-पेड डेटा प्लान

https://ift.tt/38Y3co8
नवी दिल्लीः () कंपनीकडे सध्या टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये सर्वात स्वस्त प्लान आहे. कंपनी सध्या सर्वात चांगले प्लान युजर्संना देत आहेत. बीएसएनएलने आता आणखी एक नवीन प्री-पेड प्लान आणला आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. बीएसएनएलने ३१८ रुपयांचा नवीन प्लान बाजारात आणला आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस इतकी आहे. यात युजर्संना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. बीएसएनएलने सध्या हा प्लान आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या सर्कलमध्ये उपलब्ध केला आहे. लवकरच अन्य सर्कलमध्ये हा उपलब्ध करण्याचे संकेत बीएसएनएलने दिले आहेत. BSNL च्या या प्लानमध्ये कोणत्याही प्रकारे कॉलिंगची सुविधा नाही. तसेच अन्य सुविधा नाहीत. हा प्लान म्हणजे केवळ डेटा युजर्ससाठी आहे. BSNL कडे एक ७ रुपयांचा प्लान सुद्धा आहे. एका दिवसात युजर्संना १ जीबी डेटा दिला जातो. BSNL कंपनीने ५४८ रुपयांचा प्लान आणला आहे. यात युजर्संना दररोज ५ जीबी डेटा मिळणार आहे. ९० दिवसांची या प्लानची वैधता आहे. तर ९९८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संवा २४० दिवसांपर्यंत दररोज २ जीबी डेटा दिला जाणार आहे. कंपनीचा अन्य एक १८७ रुपयांचा प्लान आहे. यात युजर्संना दररोज ३ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. यात दररोज २५० मिनिट कॉलिंग सुद्धा दिली जात आहे.