वेलिंग्टन: न्यूझीलंविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताचा डाव कोसळला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आणि ५५ षटकात भारताची अवस्था ५ बाद १२२ केली. सध्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत फलंदाजी करत आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पृथ्वी शॉ आणि मयांक आग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. पृथ्वी १६ धावा करून बाद जाला. त्यानंतर आलेला अनुभली चेतेश्वर पुजारा ११ धावा करून बाद झाला तर कर्णधार विराट कोहली अवघ्या २ धावा करून माघारी परतला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत असतानाच मयांक ३४ धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ हनुमा विहाीर ७ धावा करून माघारी परतला. न्यूझीलंडकडून कायले जॅमीसन याने तीन विकेट तर टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.