मुंबई-गोवा हायवेवर कारला अपघात; ३ जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 14, 2020

मुंबई-गोवा हायवेवर कारला अपघात; ३ जखमी

https://ift.tt/2Hmz21J
ठाणे: मुंबई-गोवा हायवेवर एक कार पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास हा झाला. जखमींना पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त (एमएच ०५ इए ५५७६) ही कार कल्याणहून श्रीवर्धनच्या दिशेनं चालली होती. हॉटेल झी गार्डनसमोरच्या पुलावर असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार १५ फूट उंचीवरून खाली कोसळली. त्यात तिघे जखमी झाले. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. त्याला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. संध्या नथू पाटील, प्रीती दत्तू कडवे, राजेश शशिकांत मोरे अशी जखमींची नावं आहेत.