आचार्य कृष्ण दत्त शर्माप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री यांचा आज जन्मदिन आहे. स्वरांगी यांच्यासह आज जन्मदिवस असणाऱ्यांना वाढदिवसाच्या आणि उज्ज्व भविष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा... आज वाढदिवस असलेल्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा... आगामी वर्षात आपल्यावर सूर्य आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य, केतू आणि शनि या ग्रहांच्या योगामुळे फेब्रुवारी महिन्यात धोका आणि जोखीम पत्करावी लागू शकते. मार्च व एप्रिल या कालावधीत राजकीय वाद संपुष्टात येईल. मे महिन्यात अनेक समस्यांचे निराकरण होईल. जून व जुलै महिन्यात व्यवसायाशी निगडीत काही अडचणी येऊ शकतात. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कौटुंबिक वाद मिटतील. ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत मित्रांच्या मदतीने कामे सुलभ होतील. डिसेंबर महिन्यात पर्यटनाचे योग आहेत. जानेवारी २०२१ मध्ये नवीन क्षेत्रात उडी घ्याल. महिलांचा मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष असेल. फेब्रुवारी महिन्यात उत्पन्नाचे स्रोत वाढतील.