म. टा. वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील टहाकारी गावात अमृता भीमा पथवे (वय-३०) या महिलेवर झोपेत अॅसिड हल्ला झाला. ही घटना मागील महिल्यात २६ जानेवरी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणातील अकोले पोलीस ठाण्यात १३ (फेब्रवारी) रात्री उशिरा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमृता पथवे २६ जानेवरी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या राहत्या घरात झोपल्या असताना आरोपी रामनाथ बाळासाहेब एखंडे (रा. टहाकारी) व त्याच्या एक मित्राने घरात घुसून झोपेत असलेल्या अमृता पथवे यांच्या अंगावर प्लास्टिकच्या बादलीमध्ये आणलेले अॅसिडसदृश औषध फेकले. यामध्ये पथवे तोंडावर, छातीवर, मांड्यावर व गुप्त भागावर गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी झालेल्या पथवे यांना नातेवाईकांनी उपचारासाठी नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये त्यांनी पुढील उपचार घेत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री अकोले पोलिसात रामनाथ बाळासाहेब एखंडे (रा. टहाकारी) व त्याच्या मित्राच्या (नाव कळू शकलेले नाही) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अॅसिड हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून अकोले पोलीस पुढील तपास करत आहे. वाचा: