अर्थव्यवस्थेवर राहुल गांधी-रघुराम राजन चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 30, 2020

अर्थव्यवस्थेवर राहुल गांधी-रघुराम राजन चर्चा

https://ift.tt/2yZIZkw
नवी दिल्ली : करोना फैलाव तसंच देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यांनी आज अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा सुरू केलीय. चर्चेच्या या श्रृंखलेत त्यांची पहिलीच चर्चा पार पडली ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या चर्चेत राहुल यांनी राजन यांना कोविड १९ मुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर तसंच सत्तेच्या केंद्रीकरणा संबंधित अनेक प्रश्न रघुराम राजन यांच्यासमोर ठेवले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नीतींवरही काही प्रश्न निर्माण केले आहेत. काँग्रेस गेल्या काही काळापासून पंतप्रधान मोदींना घेरण्यासाठी वापरत असलेले अनेक प्रश्नही राहुल यांनी राजन यांच्यासमोरही ठेवले. सत्तेच्या केंद्रीकरणावरून राजन यांना प्रश्न विचारताना 'जनतेशी थेट संवाद थांबलाय' असं राहुल यांनी म्हटलं. यावर राजन यांनी विकेंद्रीकरण अतिशय महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सामान्यांना ताकद मिळते. निर्णय वेगळीकडून घेतला गेला तर तो योग्य दिशेनं पुढे सरकणार नाही. आज पंचायतसारख्या संस्थांना कमी अधिकार दिले गेलेत. केंद्रीकरणामुळे निर्णय लवकर राबवले जाऊ शकत नाहीत, असंही रघुराम राजन यांनी म्हटलं. राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना रघुराम राजन यांनी पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनचा देशावर अधिक परिणाम जाणवला नाही. देशातील गरिबांसाठी जवळपास ६८ हजार कोटी रुपयांची गरज लागेल. परंतु, आपल्या देशाची जीडीपी जवळपास २०० कोटी असताना ही किंमत खूपच कमी आहे... आणि प्रश्न गरिबांच्या जीवाचा असेल तर हा खर्च व्हायला हवा, असंही रघुराम राजन यांनी म्हटलंय. काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संवाद श्रृंखलेत राहुल गांधी स्वीडनच्या करोनाच्या तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. देशात आत्तापर्यंत ३१ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत १००० हून अधिक जणांना आपला जीव गमावलाय.