'स्वावलंबी भारत' पॅकेज; अर्थमंत्र्यांच्या घोषणांचा आज अखेरचा दिवस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 17, 2020

'स्वावलंबी भारत' पॅकेज; अर्थमंत्र्यांच्या घोषणांचा आज अखेरचा दिवस

https://ift.tt/3dM1KHo
नवी दिल्ली : (PM ) यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर या पॅकेजसंदर्भात गेले काही दिवस सतत पत्रकार परिषदेतून माहिती देत आहेत. आज या घोषणांचा पाचवा आणि दिवटचा दिवस असेल. '' संदर्भात आज पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. या अगोदर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. शनिवारी केलेल्या घोषणांदरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केलीय. तसंच काही शस्त्रांच्या आयातीवर बंदी घालून देशातील संरक्षण उत्पादनाला चालना देणार, असंही त्यांनी म्हटलंय. यासाठी आॉर्डिनन्स कारखान्यांना कॉर्पोरेट स्वरूप देणार, त्यांचे खासगीकरण होणार नाही. शेअर बाजारात ऑर्डिनन्स फॅक्टीरीजचे लिस्टींग होणार अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केलीय.