औरंगाबादमध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू; अमरावतीत दोघांना लागण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 17, 2020

औरंगाबादमध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू; अमरावतीत दोघांना लागण

https://ift.tt/3dNiFcw
औरंगाबाद: औरंगाबादच्या जलाल कॉलनी येथील ३२ वर्षीय करोनाबाधित तरुणाचा घाटी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबादमधील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २७ झाली आहे. तर अमरावती येथे एसआरपीएफच्या दोन जवानांना करोनाची लागण झाली आहे. औरंगाबादच्या जलाल कॉलनी येथील ३२ वर्षे तरुणाला १५ मे रोजी रात्री ११ वाजता घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयात दाखल करताना त्याच्या शरीरातील प्राणवायुचे प्रमाण ७५ टक्के होते. त्याच दिवशी त्याचा लाळेचा नमुना (स्वॅब) घेण्यात आला होता व दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधीत तरुण हा करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिया तसेच इतर व्याधींमुळे त्याचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २७ झाली आहे, तर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९०१ झालेली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील २५५ करोनाबाधित हे करोनामुक्त होऊन उपचाराअंती घरी परतले आहेत. दरम्यान, अमरावतीतही आज दोन जणांना करोनाची लागण झाली. करोनाची लागण झालेले दोन्हीजण एसआरपीएफचे जवान असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.