आश्वासक टेक ऑफ! दोन महिन्यांनंतर विमाने आकाशात झेपावली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 25, 2020

आश्वासक टेक ऑफ! दोन महिन्यांनंतर विमाने आकाशात झेपावली

https://ift.tt/3eh7N7b
मुंबई : आज सोमवारपासून पुन्हा एकदा देशांतर्गत विमान सेवेला प्रारंभ झाला. दिल्लीहून सकाळी पहिले विमान पुण्यासाठी झेपावले. तर मुंबईहून पाटणासाठी सकाळी ६.४५ वाजता इंडिगोच्या विमानाने टेक ऑफ घेतला, असे मुंबई विमानतळाचे नियोजन करणाऱ्या MIAL ने म्हटलं आहे. मुंबई विमानतळावरून २५ विमानांचे उड्डाण आणि २५ विमानांच्या लँडिंगला परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली होती. मुंबईतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मुंबईतून विमान सेवा सुरू करण्यास सुरुवातीला नकर दिला होता. लखनऊहून मुंबई विमानतळावर सकाळी ८.२० मिनीटांनी पहिले विमान शहरात दाखल झाले. दोन्ही सेवा इंडिगोकडून चालवण्यात आल्या . अहमदाबादहून आलेले स्पाईसजेटचे पहिले विमान आज दिल्ली विमानतळावर लँड झाले. मागील दोन महिने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. यामुळे विमान कंपन्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. गेल्या महिन्यात काही कंपन्यांनी आगाऊ तिकीट बुकिंग सुरु केले होते. मात्र नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान सेवा इतक्यात सुरु होणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर तिकिटांचे बुकिंग रद्द करावे लागले होते. तिकिट दरांमधील भाववाढ रोखण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचनालयाने तिकिटांचे दर निश्चित केले आहेत. दरम्यान, सरकारने विमान कंपन्यांना आणि विमानतळ हाताळणाऱ्या कंपन्यांना सोशल डिस्टंसिंगचे कडेकोट पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बोर्डिंगपास काढताना तसेच प्रतिक्षालयातील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तसेच विमानात देखील दोन आसनामध्ये एक आस रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना करोनापासून संरक्षित करण्यासाठी तोंडावर मास्क, आवरण, हातमौजे अशा प्रकारच्या उपायोजना विमान कंपन्यांनी आणि विमानतळ प्राधिकरणाने केल्या आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशात २६ मे रोजी विमान सेवा सुरू होईल. तर पश्चिम बंगालमध्येही २८ मेपासून सुरू होईल. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी अम्फान महाचक्रीवादळ आले होते. या वादळात ८५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर जवळपास १ लाख नागरिकांना त्याचा फटका बसला. कोलकाता विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. यामुळेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. पण २८ मेपर्यंत सर्व पायभूत सुविधा सज्ज केल्या जातील आणि पश्चिम बंगालमधील विमान सेवा सुरू करण्यात येईल. बऱ्याच राज्यांनी उड्डाण मर्यादित ठेवली आहेत. कोलकाता आणि बागडोग्रा या विमानतळांवर येत्या गुरुवारपासून फक्त २० उड्डाणांनाच परवानगी देण्यात आलीय. हैदराबाद विमानतळावर फक्त ३० उड्डाणांना परवानगी दिली गेलीय. यापैकी १५ विमानांच्या उड्डाणांना आणि १५ विमानांच्या लँडिंगला परवानगी दिली गेलीय. विजयवाडा आणि विशाखापट्टणम विमानतळावरील सेवा अजून सुरू होणार नाही.