'लॉकडाउनचा निर्णय चुकीचा; मृतांची संख्या वाढण्याचा धोका' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 25, 2020

'लॉकडाउनचा निर्णय चुकीचा; मृतांची संख्या वाढण्याचा धोका'

https://ift.tt/2A9gO3y
रोम: करोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी अनेक देशांनी लॉकडाउन घोषित केला. मात्र, लॉकडाउनमुळे मृतांची संख्या वाढणार असल्याची भीती नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक मायकल लेविट यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउनचा निर्णया हा लोकांना त्यांच्या घरात कैद करण्यासारखा आहे. त्यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. मायकल लेविट यांनी करोना संसर्ग महासाथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात वर्तवलेला अंदाज योग्य ठरला होता. प्रा. नील फर्ग्यूसन यांच्या एका थेरीनुसार मृतांच्या संख्येचा अंदाज १० ते १२ पटीने अवास्तव असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे महासाथीच्या आजाराच्या संसर्गावर नियंत्रण आले नाही. मात्र, लोकांच्या उपजीविकेचे साधन नष्ट झाले असल्याचे त्यांनी म्हटले. लॉकडाउनमुळे करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यामुळे नुकसानच अधिक झाले आहे. रस्ते अपघातात होणाऱ्या मृतांच्या संख्येत घट झाली. मात्र, घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वाचा: प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ मार्को कोलानोविक यांनी सांगितले की, सरकारने त्रुटी असलेल्या वैज्ञानिक संशोधन शिफारसींवर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाउनच्या निर्णयामुळे फारसा परिणाम झालेला दिसत नाही. लॉकडाउन हटवण्यात आल्यानंतर संसर्गाच्या प्रमाणात घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. विषाणूची स्वत:ची एक गती असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: डेन्मार्कमध्ये शाळा आणि शॉपिंग मॉल पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण घटले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर, जर्मनीमध्येही लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आल्यानंतर संसर्गाचा दर एक टक्क्यांहून कमी नोंदवण्यात आला आहे. आणखी वाचा: