औरंगाबादमध्ये रात्रभरात २४ करोनाबाधित सापडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 5, 2020

औरंगाबादमध्ये रात्रभरात २४ करोनाबाधित सापडले

https://ift.tt/2SzuvyM
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये अवघ्या रात्रभरात २४ नवे करोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या ३२१वर गेली आहे. औरंगाबादमध्ये काल रात्री ९.३० वाजेपर्यंत ३६ नवे रुग्ण सापडले होते. त्यामुळे येथील करोनाबाधितांची संख्या २९०वर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा सहा नवे रुग्ण सापडले होते आणि आज पहाटेपर्यंत पुन्हा २४ नवे रुग्ण सापडले आहेत. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन अंकी संख्येत नवे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज सापडलेले बहुतेक रुग्ण झोपडपट्टी परिसरातील आहेत. हा झोपडपट्टीचा परिसर सील करण्यात आला असून कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे, एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. दरमयान, राज्यात सोमवारी ७७१ नवे करोनाबाधित सापडले होते. राज्यात आतापर्यंत २४६५ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या १४ हजार ५४१वर पोहोचली आहे.