नवी दिल्ली: भारतीय संघातील महान खेळाडू यांचे निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. सिंग यांचे २५ मे रोजी सकाळी चंदिगड येथे निधन झाले. त्यांनी देशाला तीन वेळा सुवर्णपदक जिंकून दिले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाचा- बलबीर यांच्या पश्चात मुलगी सुशबीर आणि कंवलबीर, करणबीर, गुरबीर अशी तीन मुले आहेत. मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयाचे संचालक अभिजीत सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६.३० वाजता बलबीर यांचे निधन झाले. निमोनिया आणि ताप आल्यामुळे बलबीर यांना ८ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ मे रोजी बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली होती. वाचा- देशातील महान खेळाडूमध्ये बलबीर यांचा समावेश होतो. आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील १६ महान खेळाडूमध्ये त्यांचा समावेश केला जातो. हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२च्या अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध त्यांनी पाच गोल केले होते. अंतिम सामन्यात पाच गोल करण्याचा त्यांचा विक्रम आजही कायम आहे. १९५७ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. वाचा- बलबीर यांनी लंडन ऑलिम्पिक १९४८, हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२ आणि मेलबर्न ऑलिम्पिक १९५६ या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले होते. १९७५ साली हॉकी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे ते व्यवस्थापक होते. गेल्या दोन वर्षात त्यांना चार वेळा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. गेल्यावर्षी निमोनिया झाल्याने ते ३ महिने रुग्णालयात होते.