उत्तर प्रदेशात दिवसभरात १०० कोटींची मद्यविक्री - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 5, 2020

उत्तर प्रदेशात दिवसभरात १०० कोटींची मद्यविक्री

https://ift.tt/3c5uk6h
नवी दिल्ली: लॉकडाउनमध्ये काल पहिल्यांदाच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशात तर काल एकाच दिवशी सुमारे २६ हजार मद्याच्या दुकांनामधून लोकांनी तब्बल १०० कोटींचे मद्य विकत घेतले. उत्तर प्रदेशात दर दिवशी ७० ते ८० कोटी रुपयांची होत असते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ४ तासांमध्ये ६.३ कोटी रुपयांची विक्री झाल्याचे महसूल अधिकाऱ्याने सांगितले. उत्तर प्रदेशात एकूण २६ हजार मद्यविक्रीची दुकाने उघडण्याचे आदेश देण्यात आल्याचे उत्तर प्रदेशच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव संजय भुसरेड्डी यांनी माहिती देताना सांगितले. उत्तर प्रदेशात कोणत्याही मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर लोकांनी गर्दी करू नये आणि ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात की नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी लोक काही ठिकाणी सकाळी ७, तर काही ठिकाणी सकाळी ८ वाजल्यापासून मद्यदुकानांबाहेर रांगांमध्ये उभे असलेले दिसले. मुंबईसारख्या शहरात मद्यविक्रीची दुकाने सुरू करावीत किंवा कसे याबाबत मात्र सरकारला ठरवता येत नव्हते. त्यानंतर उशिराने मद्यविक्रीची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता मंगळवारीच दुकाने उघडू असे मद्यविक्रेत्यांनी ठरवल्याने अनेक मद्यप्रेमींना रिकाम्या हस्तेच घरी परतावे लागले. महाराष्ट्रात सोलापूर आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये मद्यविक्रीला परवानगी नाकारण्यात आली आहे.