रेल्वेचं तिकीट मिळवणं आणखी सोपं... स्टेशन काऊंटर, एजंटद्वारेही होणार बुकिंग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 22, 2020

रेल्वेचं तिकीट मिळवणं आणखी सोपं... स्टेशन काऊंटर, एजंटद्वारेही होणार बुकिंग

https://ift.tt/2ZxNO01
नवी दिल्ली : देशात करोना व्हायरस लॉकडाऊन सुरू असताना भारतीय रेल्वेनं प्रवाशांसाठी १ जूनपासून २०० रेल्वे चालवण्याची निर्णय घेतलाय. यासाठी तिकिटांचं बुकिंग गुरुवारपासून सुरू झालंय. यानंतर रेल्वेकडून आणखी एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. यानुसार, आता काऊंटर आणि एजंटद्वारेही तिकिटांचं बुकिंग होऊ शकेल. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. शुक्रवारपासून निवडक स्टेशनवर आरक्षण काऊंटर उघडण्याची परवानगी दिलीय. लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपूर्वी स्टेशनवरचे आरक्षण काऊंटर बंद करण्यात आले होते. भारताला सामान्य परिस्थितीकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यासाठी आणखीन काही रेल्वे परत सुरू करण्यासंबंधी लवकरच घोषणा केली जाईल, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय. रेल्वे बोर्डानं दिलेल्या आदेशामध्ये, २२ मेपासून सामान्य सेवा केंद्रात (CSC) तिकीट आरक्षण काऊंटर उघडले जाऊ शकतील. ज्या स्टेशनवर तिकीट काऊंटर उघडले जाऊ शकतील, अशा स्टेशनची यादी झोनल रेल्वेकडून लवकरच जाहीर केली जाईल. या स्टेशन्सवर तिकीट काऊंटर उघडण्यासाठी प्रोटोकॉलही बनवण्यात येईल. त्यानंतर आणखी रेल्वे चालवण्याची घोषणा करू, असं पीयूष गोयल यांनी म्हटलंय.