करोनानंतर जग पूर्णपणे बदलून जाईल: राहुल गांधी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 27, 2020

करोनानंतर जग पूर्णपणे बदलून जाईल: राहुल गांधी

https://ift.tt/3gtPKfK
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार यांनी आज बुधवारी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या विषयावर तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी ते जगातील दोन मोठ्या आरोग्य तज्ज्ञांशी बोलले. त्यांपैकी एक आहेत हॉवर्ड विद्यापीठाचे . झा यांच्याशी त्यांनी लॉकडाऊन आणि चाचणीबाबत चर्चा केली. करोनानंतर जग पूर्णपणे बदलून जाईल, असे या चर्चेदरम्यान राहुल गांधी म्हणाले. कोरोना विषाणूला एकाच ठिकाणी रोखून धरता येणार नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे. या मुळे करोनाशी यशस्वी लढाई करणे शक्य होईल, असे राहुल म्हणाले. करोना विषाणूचा थेट परिणाम आर्थिक, आरोग्य आणि जगाच्या यंत्रणांवर झाला आहे. लोक म्हणतात ९/११ चा दहशतवादी हल्ल्याचा काळ हा एक नवा अध्याय होता, परंतु कोरोना नंतरचे जग हे एक नवीन पुस्तकच असेल, असे वर्णन राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्या या मुद्द्याचे समर्थन करताना प्राध्यापक झा म्हणाले की, कोरोना विषाणूनंतर जागतिक व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे. आज कोणत्या परिस्थितीत युरोप, अमेरिकेसारखे मोठे देश आले आहेत, हे आपण पाहू शकतो. राहुल गांधी कोरोना संकटाच्या या काळात सतत विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करत आहेत. राहुल गांधींनी गेल्या वेळी अर्थव्यवस्थेविषयी चर्चा केली होती, यावेळी त्यांनी करोना या विषयावर आरोग्य तज्ञाशी चर्चा केली. करोनावर कधी उपलब्ध होईल? या संभाषणादरम्यान राहुल गांधी यांनी प्राध्यापकांना लसीबद्दल विचारले. जगात करोनावर लस कधी तयार होईल, आणि भारतात ही लस कधी उपलब्ध होणार, असे प्रश्न राहुल यांनी प्राध्यापक झा यांना विचारले. त्यावर प्राध्यारक झा म्हणाले की, जगातील ३ देशांमध्ये करोनावर लस येण्याची शक्यता आहे. परंतु, पुढील वर्षापर्यंत ही लस उपलब्ध होईल अशी आपल्याला आशा असल्याचे ते म्हणाले. यासाठी भारताला नियोजन करावे लागेल, कारण भारताला ५० कोटींपेक्षा अधिक लसी बनवाव्या लागतील असे ते पुढे म्हणाले. जगभरातील सुमारे १९० देशांवर करोनाचे संकट कोसळले आहे. काही देशांमध्ये हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. बर्‍याच ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्या आले. काही दिवसांपासून लॉकडाऊन हळूहळू उघडले जात आहे.