मुंबई- करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही आपल्या घरातच आहेत. सुपरस्टार लॉकडाउन सुरू होण्याआधी कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाउसवर गेला होता. तेव्हापासून तो तिथेच आहे. एवढे दिवस फार्महाउसवर राहिल्यानंतर सलमानचं कुटुंब वांद्रे येथील घरी आल्याचं म्हटलं जात आहे. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी सलमान त्याची आई, बहीण अर्पिता खान आणि कुटुंबातील अन्य लोकांसोबत पनवेल येथील फार्महाउसवर गेला होता. फार्महाउसवर तो दिड महिन्यापेक्षाही जास्त काळ राहिला. मात्र तो मुंबई आल्याचं म्हटलं जात आहे. पण यात किती तथ्य आहे हे अजून कळाले नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने सांगितले होते की, त्याची आई, बहीण अर्पिता आणि त्याचं कुटुंब मुंबईत आलं आहे. यावरून तो कदाचित फार्महाउसवरच असेल असं म्हटलं जातं आहे. सध्या सलमान लॉकडाउन संपून कामाला सुरुवात करण्याच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच तो 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटणीचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.