करोनाच्या लसीचा मानवावर यशस्वी प्रयोग! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 24, 2020

करोनाच्या लसीचा मानवावर यशस्वी प्रयोग!

https://ift.tt/2WYHMDM
बीजिंग: विषाणूचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीचा पहिल्या टप्प्यातील प्रयोग यशस्वी चीनमध्ये यशस्वी झाला आहे. वैद्यकीय चाचणी करून मानवांवर या लसीचा प्रयोग करण्यात आल्यावर ती विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याचे दिसून आले. लसीमुळे मानवाला कोणताही अपाय होत नसल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे. 'द लँकेट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाद्वारे ही बाब समोर आली आहे. १०८ प्रौढांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला होता. साधारण १४ दिवसानंतर लसीमुळे मानवी देहात 'टी-सेल्स' आणि 'अँडीबॉडी' तयार होण्यास सुरुवात होते, असे २८ दिवसांच्या निरीक्षणांनंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. तयार झालेल्या अँटीबॉडीमुळे मानव करोना आणि 'सार्स-कोव्हिड-२' या विषाणूंचा सामना करणारी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल, असा निष्कर्ष या संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे. मात्र, 'सार्स-कोव्हिड-२'चा संसर्ग रोखण्याची क्षमता या लशीमध्ये आहे की नाही, याची चाचणी अद्याप झाली नसल्याचे चीनच्या 'बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी'च्या शास्त्रज्ञांनी सांगितले. वाचा: चीनमध्ये लक्षणे नसलेले २८ रुग्ण करोनाची कोणतीही लक्षणे न आढळणाऱ्या २८ जणांची वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापैकी बहुसंख्य रुग्ण करोनाचे उत्पत्तीस्थान ठरलेल्या वुहान शहरातील आहेत. चीनच्या राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोणतीही लक्षणे न आढळणारे ३७० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २६ जण विदेशातील असून, सर्व रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शुक्रवारी करोनाचा कोणताही नवा रुग्ण आढळला नसल्याचेही आयोगाने सांगितले. दक्षिण कोरियात नवे २३ रुग्ण सेउल : दक्षिण कोरियामधील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असलेल्या सेउल शहरात करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले आहेत. करोनाच्या रोग निवारण आणि प्रतिबंध केंद्रातर्फे ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सेउलमधील ज्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून कडक निर्बंध पाळले जात आहेत, त्याच भागात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत ११ हजार १६५ रुग्ण आढळले असून, २६६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणखी वाचा: