फोटोग्राफर्सची रणबीर- आलियाने केली विचारपूस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 14, 2020

फोटोग्राफर्सची रणबीर- आलियाने केली विचारपूस

https://ift.tt/2Z5kdur
मुंबई- दिवंगत बॉलिवूड अभिनेते यांच्या तेराव्याला मुलगी आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिसले. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दोघं गाडीत बसलेले असताना छायाचित्रकारांच्या तब्येतीची चौकशी केली. व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया दोघं एकत्र ऋषी यांच्या घरी जाताना दिसतात. यावेळी फोटोग्राफरच्या जवळ नेऊन रणबीरने गाडी थांबवली. गाडीत बसलेली आलिया फोटोग्राफर्सना मास्क घालायला सांगते. रणबीरने केली विचारपूस- यानंतर रणबीरने फोटोग्राफर्सना त्यांची तब्येत ठीक आहे ना असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना फोटोग्राफर्सनेही 'सर, सारं काही ठीक आहे' असं सांगितलं. यानंतर रणबीरने तुम्ही असे फिरू शकता का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, बाहेर तर पडू नये. पण असं करायला सांगितलं आहे. रणबीरने सांगितली काळजी घ्यायला- यानंतर त्याने सर्वांना काळजी घ्यायला सांगितली आणि गाडी पुढे नेली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून रणबीरच्या विनम्रतेचं कौतुकही केलं जात आहे. ऋषी कपूर यांच्या तेराव्याला हे लोक होते सहभागी रणबीर आणि आलियाशिवाय ऋषी यांचे भाऊ रणधीर कपूर, बबिता कपूर, करिश्मा कपूर, रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा तिची मुलगी नव्या नवेली नंदा सहभागी झाले होते. यावेळीही सोशल डिस्टन्सिंगची पुर्ण काळजी घेण्यात आली होती.