लंडन: चीनमध्ये सुरू झालेल्या जगभरात फैलावला आहे. सुमारे २१० देशांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला असून बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. चीननंतर संसर्गाचे केंद्र युरोप झाले होते. युरोपमध्ये करोनाचा हाहाकार सुरू असून जवळपास तीनपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. युरोपमधील इटली, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आदी प्रमुख देशांमध्ये एक लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, इटली, स्पेन, फ्रान्स व ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. या अभ्यासानुसार, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या जवळपास ५३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा दावा या अभ्यास अहवाला करण्यात आला आहे. तर, ब्रिटनमधील १७ हजार रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यातील ३३ टक्के करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. तर, ४९ टक्के जणांनी उपचाराला प्रतिसाद देत करोनावर मात केली. तर, १७ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इबोलापेक्षाही करोना अधिक प्राणघातक ठरत आहे. इबोला आजारामुळे युरोपमध्ये १० पैकी पाच रुग्णांचा बळी जात होता. वाचा: ब्रिटनमध्ये करोनाच्या संसर्गाने आतापर्यंत २६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक लाख ७० हजारांहून अधिकांना बाधा झाली आहे. युरोपमध्ये इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीत २७ हजारजणांचा मृत्यू झाला असून स्पेनमध्ये २४ हजार ५४३ जणांनी प्राण गमावले आहेत. फ्रान्समध्ये करोनामुळे २४ हजार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. आणखी वाचा: