भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसची 'स्पीक अप' मोहीम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 28, 2020

भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसची 'स्पीक अप' मोहीम

https://ift.tt/2X7VJ2a
नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या संकटकाळात सर्वात जास्त प्रभाव पडलेल्या स्थलांतरीत मजूर तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेसनं चालवण्याचा निर्णय घेतलाय. '' या मोहिमेला आज सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरूवात झालीय. सायंकाळा ४.०० वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेंतर्गत पक्षाचे नेते समर्थक आणि कार्यकर्त्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधणार आहेत. या मोहिमेत अध्यक्ष , , तसंच काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मोठे नेते सहभागी झाले आहेत. पक्षानं केलेल्या दाव्यानुसार, या मोहिमेत ५० लाखांहून अधिक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होत आहेत. आर्थिक परिस्थिती, स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न तसंच बेरोजगारी या संकटांवर 'स्पीक अप'मध्ये चर्चा केली जाणार आहे. वाचा : वाचा : या मोहिमेद्वारे काँग्रेस मोदी सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या मांडत आहे. स्थलांतरीत मजुरांना मोफत त्यांच्या घरी पोहचवण्यात यावं तसंच त्यांना १० हजार रुपयांची तत्काळ मदत पुरवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. दुसऱ्या मागणीद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तत्काळ आर्थिक सहाय्य देण्याची मागणी काँग्रेसनं मांडली आहे. याशिवाय मनरेगामध्ये कामाचे दिवस वाढवून वर्षातून २०० दिवस करण्याची मागणीही विरोधी पक्षानं केलीय. सुरुवातीला वर्षांत १०० दिवसांची रोजगार हमी देणाऱ्या या योजनेत दिवसांची वाढ करून अगोदर वर्षात १२० दिवस आणि नंतर वर्षाला १५० दिवसांची रोजगार हमी या योजनेद्वारे देण्यात आली होती. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, यांच्यासहीत पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी व्हिडिओ संदेश जारी करणार आहेत. वाचा : वाचा :