प्रवासी महिलेने मुलाचं नाव ठेवलं सोनू सूद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 28, 2020

प्रवासी महिलेने मुलाचं नाव ठेवलं सोनू सूद

https://ift.tt/2ZJnsbq
मुंबई- सध्या करोना व्हायरसचा विळखा कमी करण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन अजूनही कायम ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, अभिनेता स्वखर्चाने मुंबईत अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवत आहे. प्रत्येकालाच त्यांच्या कुटुंबासोबत रहायचा अधिकार आहे असंही त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे शेवटचा मजूर ज्याला स्वराज्यात परतायचं आहे तो स्वतःच्या घरी जाईपर्यंत मी बस सेवा सुरू ठेवणार असंही तो म्हणाला होता. सोनू दिवस- रात्र या कामात बुडालेला आहे. त्याने ज्या महिलेला घरी पाठवलं होतं तिने आता मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव चक्क सोनू सूद ठेवलं आहे. ही गोष्ट जेव्हा सोनूला कळली तो भावुक झाला. मुलाचं नाव सोनू सूद श्रीवास्तव सध्या सोनूहाच स्थलांतरीत मजुरांचा देव झाला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना त्याने एक मजेशीर घटना सांगितली. सोनू म्हणाला की, १२ मे रोजी काही लोकांना दरभंगा पाठवलं होतं. यात एक गरोदर महिलाही होती. घरी पोहचण्याच्या काही दिवसांनी महिलेला मुलगा झाला. त्या कुटुंबाने सोनूला फोन करून सांगितलं की, त्यांनी मुलाचं नाव सोनू सूद श्रीवास्तव ठेवलं आहे. यावर सोनूने त्यांना विचारलं सोनू सूद कसं सोनू श्रीवास्तव हवं ना? त्यावर महिला म्हणाली की, नाही.. आम्ही मुलाचं नाव सोनू सूद श्रीवास्तव ठेवलं आहे. सोनू म्हणाला की ते फारच भावुक करणारं होतं. राज्यपालांनी दिलं कॉफीचं निमंत्रण सोनूसाठी बुधवारचा दिवस फार विशेष होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशयारी यांनी सोनूला फोन करून त्याचं कौतुक केलं. सोनूने सांगितलं की 'माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट होती. त्यांनी माझं कौतुक केलं आणि म्हणाले की आपल्याला भेटलं पाहिजे उद्या, परवा कॉफी प्यायला या.' दररोज येतात जवळपास ५६ हजार मेसेज सोनू पुढे म्हणाला की, 'दररोज हजारो कॉल येत आहेत. मला देशभरातून जवळपास ५६ हजार मेसेज दररोज येतात. हे एक चॅलेन्ज आहे पण मदक करण्याने समाधानही मिळतं. देव काय काय शिकवतं आणि काय काय करून घेतो हे सारचं अचंबित करणारं आहे. मला प्रत्येक ठिकाणाहून फक्त प्रेम मिळत आहे.' झोपूही शकत नाही सोनू सूद सोनूला जेव्हा तो किती तास झोपतो असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की ,'आम्ही झोपतो कुठे? मी कधी कधी सकाळी ४ वाजेपर्यंत जागा असतो तर कधी ६ वाजेपर्यंत मेसेजना उत्तर देत असतो.'