धोनीच्या निवृत्तीवरून चाहते भिडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 28, 2020

धोनीच्या निवृत्तीवरून चाहते भिडले

https://ift.tt/2TMs2lf
नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीसंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. बुधवारी सोशल मीडियावर #Dhoni Retiers हा हॅशटॅग ट्रेंड झाला. यावर धोनीचे चाहते भडकले. त्यांनी #Dhoni Never Retire हा नवा हॅशटॅग तयार केला. अर्थात दरवेळी प्रमाणे यावेळी देखील धोनीकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. पाहूयात चाहते काय म्हणाले... वाचा- एमएस : द ट्रॉफी मास्टर टीम इंडियाच्या यशाचे रहस्य तोपर्यंत निवृत्ती घेऊ नको एका भडकलेल्या चाहत्याची प्रतिक्रिया तुझी आठवण येईल ज्याने #DhoniRetiers हा ट्रेंड सुरू केला लक्ष देऊ नका बांगलादेशविरुद्ध २००४ मध्ये वनडेत पदार्पण करणाऱ्या धोनीने न्यूझीलंडविरुद्ध अखेरची वनडे खेळली होती. या सामन्यात त्याने ५० धावांची खेळी केली होती. पण भारताचा १८ धावांनी पराभव झाला आणि भारताचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न भंगले. धोनीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने भारताकडून ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळले आहे. त्याने कसोटीत ४ हजार ८७६, वनडेत १० हजार ७७३ आणि टी-२०त १ हजार ६१७ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून धोनीने २०० सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यातील ११० सामन्यात विजय आणि ७४ मध्ये पराभव झाला. धोनी भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणारा खेळाडू आहे.