औरंगाबाद ठरतोय करोना हॉटस्पॉट! ३५ नवीन रुग्ण सापडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 28, 2020

औरंगाबाद ठरतोय करोना हॉटस्पॉट! ३५ नवीन रुग्ण सापडले

https://ift.tt/3gB6odN
म. टा. प्रतिनिधी, : जिल्ह्यामध्ये आणखी ३५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १३९७ झाली आहे. औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यात ३५ नवीन बाधितांची भर पडली आहे. त्यामुळं आता एकूण रुग्णांची संख्या १३९७ झाली आहे. नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये बायजीपुरा येथील १, मिसारवाडी १, वाळूज महानगर १, बजाजनगर १, संजयनगर १, शहागंज १, हुसेन कॉलनी १, कैलास नगर १, रोकडिया हनुमान कॉलनी २, उस्मानपुरा १, इटखेडा १, एन-४ येथे ३, नारळीबाग २, हमालवाडी ४, रेल्वे स्टेशन परिसर २, सिटीचौक परिसर १, नाथ नगर १, बालाजी नगर १, साई नगर, एन-सहा १, संभाजी कॉलनी, एन-सहा २, करीम कॉलनी, रोशन गेट १, अंगुरी बाग १, तानाजी चौक, बालाजी नगर १, एन-११, हडको १, जयभवानीनगर २ आदी भागातील रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये १४ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. उस्मानाबादमधील करोना रुग्णांची संख्या ५०पार उस्मानाबादमध्येही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काल रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चार करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. विनामास्क फिराल तर खबरदार! करोना आजाराचा फैलाव होत असताना शहरात अनेक जण विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. प्रामुख्याने ज्या भागात करोनाचे रुग्ण सापडले आहेत, त्या भागात देखील विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता विनामास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 'सारी'ने काढले डोके वर सारी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या चोवीस तासांत सारी आजाराचे ९ रुग्ण सापडले. सारी रुग्णांची आतापर्यंत एकूण संख्या ३६४ झाली आहे. त्यामुळं करोनाबरोबरच आता सारी या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.