करोनाच्या संसर्गामुळे ३ लाख नागरिकांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 15, 2020

करोनाच्या संसर्गामुळे ३ लाख नागरिकांचा मृत्यू

https://ift.tt/2WV7Nmc
न्यूयॉर्क: जगभरात थैमान घातलेल्या करोनाच्या संसर्गाने तीन लाख नागरिकांचे प्राण घेतले आहेत. तर, ४५ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असल्याचे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिले आहे. यात करोनाच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्यांची निम्मी संख्या ही अमेरिका, ब्रिटन आणि इटली या देशांतील नागरिकांची आहे. करोनाच्या संसर्गामुळे चीनमधीन वुहान येथे १० जानेवारी रोजी पहिला बळी गेला असल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर ९१ दिवसांमध्ये एक लाख जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर १६ दिवसांमध्ये मृतांचा आकडा दोन लाखांपर्यंत पोहचला. दोन लाख ते तीन लाख नागरिकांचा मृत्यू हा १९ दिवसांत झाला असल्याचे 'रायटर'ने म्हटले आहे. मलेरियाच्या आजाराने जगभरात दरवर्षी चार लाख नागरिकांचा मृत्यू होतो. त्यातुलनेत करोनाच्या आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. करोनाच्या आजाराने तीन लाख नागरिकांचा मृत्यू झाला असताना जवळपास १७ लाख नागरिकांनी आजारावर मात केली आहे. वाचा: अमेरिकेत करोनाच्या संसर्गमुळे ८५ हजारजणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, ब्रिटनमध्ये ३० हजारांहून अधिकजणांना प्राण गमवावे लागले आहे. इटलीमध्ये ३१ हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याशिवाय फ्रान्स, स्पेनमध्ये २७ हजार, ब्राझीलमध्ये १३ हजार नागरिकांचा मृत्यू करोनाच्या आजाराने झाला आहे. आणखी वाचा: