विदर्भात धोका वाढतोय! अकोल्यात १० तर यवतमाळमध्ये दोन नवे रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 8, 2020

विदर्भात धोका वाढतोय! अकोल्यात १० तर यवतमाळमध्ये दोन नवे रुग्ण

https://ift.tt/2YJdW7B
अकोला/यवतमाळ: मुंबई, पुण्याप्रमाणेच विदर्भातील प्रमुख शहरांमध्येही करोनाचा संसर्ग सातत्यानं वाढत आहे. अकोल्यात आज सकाळपासून १० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, यवतमाळमध्ये दोन नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यवतमाळमध्ये सुरुवातीपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत होतं. आता अकोल्यातही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आज सकाळी आलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालानुसार अकोल्यात १० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात सहा महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमध्ये बैद पुरा येथील ८, भगतसिंग चौक माळीपुरा व जुन्या शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अकोल्यातील एकूण बाधितांचा आकडा आता १०५ वर पोहोचला असून सध्या ८० रुग्ण उपचार घेत आहेत.