ना लॉकडाउन, ना अनलॉक; 'असा' असेल हा आठवडा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 1, 2020

ना लॉकडाउन, ना अनलॉक; 'असा' असेल हा आठवडा!

https://ift.tt/3dhh1QJ
नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले लॉकडाउन आता संपले आहे. लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर आता चा टप्पा सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनमधील ३० जूनपर्यंत वाढविला आहे. उर्वरित भागांमध्ये हळूहळू नियम शिथिल करण्यात येणार आहेत. परंतु अनलॉक-१ ची सुरूवात ८ जूनपासून सुरू होईल. १ जून ते ८ जून या काळात पूर्णपणे लॉकडाउनही असणार नाही आणि अनलॉक-१ ही असणार नाही. म्हणून या काळात कोणते नियम कायम राहतील आणि कोणत्या गोष्टींना परवानगी असेल, हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. हा आठवडा कसा असेल? १ ते ८ जून या काळात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व व्यवस्था चालवली जाईल. केंद्राने ८ जूनपासून सूट दिली आहे. लॉकडाउन संपल्यावर आणि अनलॉक-१ सुरू होण्याच्या दरम्यान एक प्रकारचा 'बफर पीरियड' आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर जनजीवन सामान्य राखण्यासाठी आता राज्यांना अधिकार असतील. करोनापासून बचाव करण्यासाठी काही उपक्रम रोखण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. म्हणूनच केंद्राव्यतिरिक्त इतर राज्यांची मार्गदर्शकतत्त्वे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. लॉकडाउन ४.० पासून मुक्ती मिळणार की नाही? १ ते ७ या सात दिवसांच्या काळात आपल्याला किती सूट मिळेल, हे आपल्या राज्यातील सरकारवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्राने तीन टप्प्यात अनलॉकिंग योजना बनविली आहे. ३ जूनपासून काही नियमांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. त्यानंतर ५ जूनला सवलतीत थोडीशी वाढ केली जात आहे. त्यानंतर ८ जूनपासून केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूट मिळणार आहे. परंतु, महाराष्ट्राने आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिलेली नाही. या आठवड्यात दिल्लीमध्ये लोक सकाळी ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर पडू शकणार नाही. पूर्वी रात्री ७ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. तर, जम्मू-काश्मीरने कोणताही दिलासा न देता ८ जूनपर्यंत लॉकडाउन सुरूच ठेवला आहे. तेलंगणाने ३० जूनपर्यंत लॉकडाउन सुरू ठेवला आहे. परंतु केंद्राकडून मिळणारी सूट तेलंगणच्या नागरिकांना मिळणार आहे. १ ते ७ जूनपर्यंत या गोष्टी बंदच असतील > मॉल, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स. > मंदिरे. > शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था. > आंतरराष्ट्रीय विमान प्रवास. > मेट्रो रेल्वे सेवा. > जलतरण तलाव / मनोरंजन पार्क / रंगमंच / सभागृह / हॉल / बार कोणत्या मिळणार? अनेक राज्यांनी १ ते ७ जून दरम्यान अधिक दिलासा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, कंटेनमेंट झोनच्या बाहेर मात्र सवलती दिल्या जात आहे. बहुतेक राज्यांकडे आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी आहे, परंतु, राज्याबाहेर जाण्यासाठी प्रथम परवानगी घ्यावी लागणार आहे. कर्नाटकमधील अनलॉक-१ च्या पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट ८ जूनपासून सुरू होत आहेत. दिल्लीमध्ये आता लोक पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत बाहेर जाऊ शकतील. सध्या महाराष्ट्रात फक्त अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशनेही केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूट दिली आहे. पण, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद आणि नोएडामध्ये सीमा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. आंतरराज्यीय प्रवास सुरू झाला बर्‍याच राज्यांनी इतर राज्यांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि तामिळनाडूने ही परवानगी दिलेली नाही. काही ईशान्येकडील राज्यांनीही आंतरराज्यीय प्रवास बंदच ठेवला आहे. यूपीनेही राज्याबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. आसपासच्या भागात प्रवास करण्याला परवानगी मिळावी, अशी दिल्ली सरकारचा प्रयत्न आहे, परंतु यूपीच्या दोन्ही जिल्ह्यांनी ३० जूनपर्यंत आपली सीमा बंदच ठेवली आहे.