अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारत इतरांसाठी 'प्रेरणा' ठरेल : पंतप्रधान मोदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 30, 2020

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारत इतरांसाठी 'प्रेरणा' ठरेल : पंतप्रधान मोदी

https://ift.tt/2yKuIsk
नवी दिल्ली : शनिवारी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचं पहिलं वर्ष पूर्ण होतंय. नरेंद्र मोदी २.० सरकारला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी लिहिलंय. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्रात तसंच अर्थव्यवस्थेचा उल्लेख केलाय. देश करोना संकटातून तसंच अर्थव्यवस्थेच्या संकटातून बाहेर पडणार, अशी आशा पंतप्रधानांनी या पत्रात व्यक्त केलीय. यासाठी नागरिकांना धैर्य कायम राखण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. परिस्थिती सामान्य असती तर मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळालं असतं परंतु, करोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यात मी पत्राद्वारे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय, असं म्हणत करोना संकटाचा आपापल्या स्तरावर सामना करणाऱ्या नागरिकांना पंतप्रधान मोदींनी साद घातलीय. या पत्रात मोदींनी पहिल्या कार्यकाळाचाही उल्लेख केलाय. यानंतर दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षातलं यशही त्यांनी अधोरेखित केलंय. वाचा : वाचा : 'सध्या आपण असुविधेचा सामना करत आहोत, परंतु, ही परिस्थिती मोठ्या उद्ध्वस्ततेकडे सरकू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायला हवी. यासाठीच प्रत्येक नागरिकानं नियम आणि गाइडलाईन्सचं पालन करणं आवश्यक आहे. देशानं आत्तापर्यंत धैर्य कायम राखलंय यापुढेही ते कायम राहायला हवं. इतर देशांच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित असण्याचं हे एक मोठं कारण आहे. ही एक मोठी लढाई आहे पण आपण विजयाच्या मार्गावर आहोत आणि हा विजय आपल्याला सामूहिक प्रयत्नांनीच प्राप्त होईल' असंही मोदींनी आपल्या पत्रात म्हटलंय. जगभरात सुरू असलेल्या अर्थव्यवस्थेच्या चर्चेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणतात, 'मला विश्वास आहे की करोना संकटातून सावरेल, यासाठी भारत हा इतर देशांसाठी एक प्रेरणा ठरेल. अर्थव्यवस्था क्षेत्रात १३० कोटी भारतीय जगाला केवळ आश्चर्यचकीतच करणार नाहीत तर त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. यावेळेची सर्वात मोठी गरज आहे आत्मनिर्भर बनण्याची... यासाठीच नुकतंच देण्यात आलेलं २० लाख कोटींचं पॅकेज एक मोठं पाऊल आहे' असा दावाही पंतप्रधान मोदींनी या पत्रातून व्यक्त केलाय. वाचा : वाचा :