इरफान, ऋषींवर केआरकेचं आक्षेपार्ह ट्वीट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 1, 2020

इरफान, ऋषींवर केआरकेचं आक्षेपार्ह ट्वीट

https://ift.tt/2YogmIK
मुंबई- आणि यांच्या निधनाने सिनेप्रेमी दुःखी आहेत. तर स्वतःला समीक्षक म्हणवणाऱ्या कमाल राशिद खानने दोन्ही अभिनेत्यांविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केलं आहे. यानंतर सोशल मीडिया युझर्सने त्याला चांगले सुनावले आणि ट्विटरवर #SuspendKRK हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. यासोबतच युझरने त्याचं अकाउंट सस्पेन्ड करण्याची मागणी केली. थोड्यावेळाने केआरकेने त्याचं ट्वीट डिलीट केलं. नावाने प्रसिद्ध असलेला कमाल राशिद खान अनेकदा त्याच्या अतर्क्य वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. ऋषी कपूर यांच्यासाठी केलं हे वक्तव्य- इरफान खान यांच्या धक्क्यातून बॉलिवूड सावरणार इतक्यात त्याच रात्री ऋषी यांना इस्पितळात भरती केल्याची बातमी आली. यानंतर प्रत्येकजण त्यांच्या प्रकृती स्थीर असण्याची कामना करू लागला. केआरकेने यावर ट्वीट करत म्हटलं की, 'ऋषी कपूर यांना एचएन रिलायन्स इस्पितळात भरती केलं आहे आणि मला काही बोलायचं आहे. सर बरे होऊन परत या. निघून नका जाऊ. कारण दारूची दुकानं २-३ दिवसांत सुरू होणार आहेत.' केआरकेचं इरफान आणि ऋषी यांच्यासाठीचं ट्वीट- याआधी केआरकेने अजून एक ट्वीट केलं होतं. 'मी काही दिवसांपूर्वी करोना काही प्रसिद्ध व्यक्तींना घेतल्याशिवाय जाणार नाही असं म्हटलं होतं. मी त्यांची नावं लिहिली नव्हती. कारण लोक मला शिव्या देतील. पण मला माहीत होतं की इरफान आणि ऋषी कपूर जातील. मला हेही माहीत आहे की पुढचा नंबर कोणाचा आहे.' अभिनेताच नाही तर राजकीय नेत्यांवरही करतो ट्वीट- केआरके दर दिवशी काही ना काही आक्षएपार्ह ट्वीट करत असतो. हे कमी की काय स्वतः केलेल्या चुकीबद्दल माफी मागण्याऐवजी तो त्याचं समर्थनच करतो. तो फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींवरच नाही तर अनेक राजकीय नेत्यांवर आक्षेपार्ह टिपण्या करत असतो.