औरंगाबादेत धोका वाढला; करोनाचे नवे २६ रुग्ण, एकूण १२०० बाधित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 22, 2020

औरंगाबादेत धोका वाढला; करोनाचे नवे २६ रुग्ण, एकूण १२०० बाधित

https://ift.tt/3e9INi5
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/ जालना : शहर परिसरातील आणखी २६ व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १२१२ झाली आहे. तसेच आतापर्यंत ४२ बाधितांचा मृत्यू झाला असून, ५०० पेक्षा जास्त बाधित हे करोनामुक्त झाले आहेत. शहर परिसरात नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये जयभीम नगर येथील ५, गरम पाणी २, रहेमानिया कॉलनी २, कुवार फुल्ली, राजाबाजार १, सुराणा नगर १, मिलकॉर्नर १, न्याय नगर ४, भवानीनगर, जुना मोंढा ३, पुंडलिकनगर १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, कटकट गेट ३, एक-दोन, सिडको, ठाकरे नगर येथील १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. बाधितांमध्ये आठ वर्षांच्या दोन मुलांपासून ते ७० वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. त्याचवेळी बाधितांमध्ये १० महिला, तर १६ पुरुष आहेत. जालन्यात करोनाबधितांचा आकडा ५१ वर जालन्यात आणखी सात करोनाबाधित सापडले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ५१ झाली आहे. बुधवारी जिल्ह्यातील एकूण १३७ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यात ७ जण पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले आहे. भोकरदन येथील राज्य राखीव दलातील ६२ जवान, नवीन जालना भागातील खासगी रुग्णालयाशी संबधित २५, जिल्हा रुग्णालयातील ३२, मंठा तालुक्यातील पेवा येथील १५ आणि परतूर येथील २ अशा १३७ जणांचा समावेश होता. यातील जुना जालना भागातील एका खासगी रुग्णालयातील चार कर्मचारी, नवीन जालन्यातील खासगी रुग्णालयातील १ , भोकरदन येथील एक जवान आणि मंठा तालुक्यातील पेवा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला एक जण असे एकूण सात जण पॉझिटिव्ह आले आहेत.