सेट तोडल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 27, 2020

सेट तोडल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक

https://ift.tt/2TLiqr8
एर्णाकुलम- केरळमधील एर्णाकुलम येथे २४ मे रोजी सिनेमाचा सेट तोडण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. '' या सिनेमाच्या सेटची तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पेरियार नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या शंकराचार्य मठाच्या बाजूला हा सेट उभा करण्यात आल्यामुळे संघटनेचे लोक नाराज होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या लोकांमध्ये कारी रतीश नावाचा व्यक्तीही सामील आहे. कारी हा बजरंग दलाच्या एर्णाकुलम यूनिटचा अध्यक्ष आहे. रतीशची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरोधात याआधीच २९ गुन्हे दाखल आहेत. रतीशने सेटची तोडफोड करणाऱ्यांचं प्रतिनिधीत्त्व केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सेटच्या तोडफोडीवर नाराजी व्यक्त करणारं ट्वीट केलं होतं. सिनेमाच्या सेटवर एक चर्च तयार करण्यात आलं होतं. हे चर्च उभं करण्यासाठी ५० लाखांचा खर्च आला होता. दी किनारी उभारण्यात आलेल्या या सेटच्या दुसऱ्या बाजूला शंकराचार्यांचा मठ आहे. सिनेमाचे दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे, सेट तयार करण्यापूर्वी त्यांनी स्थानिक प्रशासन, पंचायत आणि स्थानिक लोकांची परवानगी घेतली होती. सिनेमाच्या सेटची परवानगी फेब्रुवारी महिन्यातच घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर काहींनी या सेटचा विरोध केला. 'मिन्नल मुरली' सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता टोविनो ऑमसने या घटनेवर नाराजी व्यक्त केली. टोविनो म्हणाला की, 'सेट उभा करण्यात फार खर्च आला होता आणि लॉकडाउनमुळे चित्रीकरण थांबल होतं. सेट तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.'