शाहरुख खानच्या घरी कुराण- गणपती दिसले एकत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 5, 2020

शाहरुख खानच्या घरी कुराण- गणपती दिसले एकत्र

https://ift.tt/2xAyCn3
मुंबई- करोनाग्रस्तांशी मदत करण्यासाठ बॉलिवूड स्टार्स '' या कॉन्सर्टमधून एकत्र आले होते. या कॉन्सर्टमधून जास्तीत जास्त प्रमाणात रक्कम गोळा करणं ही होती. यात शाहरुख खाननेही परफॉर्म केलं. सध्या त्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यादरम्यान त्याच्या चाहत्यांना किंग खानच्या घरात अशी काही गोष्ट दिसली की आता त्यासाठी सर्वात जास्त कौतुक केलं जात आहे. व्हिडिओमध्ये दिसला अबराम खान- कोविड- १९ रिलीफ फंडसाठी अमिताभ बच्चन, , आमिर खान, हृतिक रोशन आणि आयुष्मान खुराना यांनीही या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये भाग घेतला. सगळ्यांनी चाहत्यांकडे या कठीण काळात मदत करण्याचं आवाहन दिलं. शाहरुखने 'सब सही हो जाएगा' गाण्यावर परफॉर्म केलं. हे गाणं रॅम्पर बादशहाने कम्पोज केलं होतं. या व्हिडिओमध्ये अबरामही दिसला. शाहरुखने दिला मजेशीर मेसेज- व्हिडिओ शेअर करताना शाहरुखने ट्विटरवर जोडल्या गेलेल्या लोकांना धन्यवाद म्हटलं आणि लिहिलं, 'आता लॉकडाउनमध्ये मला गातानाही तुम्हाला ऐकावं लागेल. अबराम सांगतो की बाबा आता बास झालं. पण सगळं नीट होईल.' चाहत्यांनी पाहिली सर्वात सुंदर गोष्ट- शाहरुखचा हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांनी गणपतीची मुर्ती आणि कुरान असल्याचं पाहिलं. यानंतर यासंबंधी अनेक ट्वीट आले. एका चाहत्याने लिहिले की, 'गणेशही मिळेल आणि कुराणही मिळेल.. हे शाहरुखचं मन्नत आहे साहेब. इथे तुम्हाला प्रत्येक धर्म मिळेल.'