शेअर बाजार; या गोष्टी ठरवतील आजची दिशा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 18, 2020

शेअर बाजार; या गोष्टी ठरवतील आजची दिशा

https://ift.tt/2CaNUAO
मुंबई : भारत आणि चीन दरम्यान लडाखच्या गलवान खोऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भू-राजकीय अस्थिरतेचे बुधवारी भांडवली बाजारात पडसाद उमटले. बुधवारी निफ्टीवर दबाव वाढला होता. ९९०० ची पातळी तोडल्याने निफ्टी आता आवरते घेत आहे असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांनी सांगितले. त्यामुळे ९७२० ते १००४६ हा स्तर आज पाहायला मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री झालेल्या हाणामारीत भारताचे जवळपास केवळ तीन नाही तर कमीत कमी २० सैनिक हुतात्मा झाल्याचं आता स्पष्ट झालंय. भारतीय लष्करानं या बातमीला दुजोरा देण्यात आलाय. सोबतच, गलवान खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. उंचावरच्या गलवान हाणामारीत १७ गंभीररित्या जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आलं. परंतु, उंचावरच्या ठिकाणाच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. तर चीनी सैन्यात जिवीतहानी झाली असली तरी नेमके किती मृत्यू झालेत हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे नजीकच्या काही सत्रात सीमेवरील तणावाचे पडसाद उमटतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. दरम्यान, गलवान खोऱ्याची घटना समोर आल्यानंतर शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली होती. मात्र बुधवारी दिवसअखेर निफ्टी ९८८१ अंकांवर स्थिरावला. ३३५०७ अंकांवर बंद झाला. त्यात ९७ अंकांची घसरण झाली. निफ्टी ९५५० ते ९६०० च्या दरम्यान राहील, असे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल यांनी भाकीत केले. ते म्हणाले की आजच्या सत्रात ऑटो, मेटल, इन्फ्रा या क्षेत्रातील शेअर्सला मागणी राहील. करोनाची दुसरी लाट आल्याचे अंदाज व्यक्त केल्याने सोमवारी जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली होती. फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बॉंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. चीनमधील करोना रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे आशियातील भांडवली बाजाराला दिलासा मिळाला. ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि चीन, अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते.