सीमा प्रश्न चर्चेच्या मार्गाने सोडविणार; चीनची नरमाईची भूमिका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 6, 2020

सीमा प्रश्न चर्चेच्या मार्गाने सोडविणार; चीनची नरमाईची भूमिका

https://ift.tt/373MUtE
बीजिंग: भारताबरोबर सध्या सुरू असलेला सीमातंटा योग्य रीतीने सोडविण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही चीनने शुक्रवारी दिली. शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान वाटाघाटी होणार आहेत, या पार्श्वभूमीवर चीनकडून हे विधान करण्यात आले आहे. दरम्यान,परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव यांनी यांनी सायंकाळी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक वू जियांगाव यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशातील मतभेद शांततेने आणि चर्चेच्या मार्गाने सोडविण्याचे यात सहमती दर्शविण्यात आली. दोन्ही देशांच्या संवेदनशीलता, चिंता आणि अपेक्षांचे रुपांतर वादात होऊ द्यायचे नाही आणि या बाबींचा सन्मान करण्याचेही या दोन्ही अधिकाऱ्यांनी निश्चित केले. पूर्व लडाखमधील पँगाँग त्सो, डेमचोक आणि गलवान खोरे या भागात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. त्यांना त्यांच्या हद्दीत परत पाठविण्यासाठी भारतीय सैन्य प्रयत्नशील आहे. यावरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव उद्भवला आहे. आतापर्यंत चर्चेच्या दहा फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. आता दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांदरम्यान वाटाघाटी होणार आहेत. या संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग श्वांग म्हणाले, 'सध्या सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे. सीमाप्रश्नासंदर्भातील प्रक्रिया निर्धारित आहे. लष्करी आणि राजनैतिक माध्यमांतून आमचा संवाद सुरू आहे. या प्रश्नाची सोडवणूक योग्य मार्गाने व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.' चीनने पश्चिम कमांडमधील अधिकारी बदलला चीनने पश्चिम थिएटर कमांडमधील लष्कराचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल हू किलिन यांची नियुक्ती केली आहे. ते सध्या पूर्व थिएटर कमांडमध्ये नियुक्त आहेत. शनिवारी भारताबरोबर होणाऱ्या वाटाघाटींच्या आदल्या दिवशीच हा बदल करण्यात आला आहे. पश्चिम थिएटर कमांडवर भारताबरोबरची ३,४८८ किलोमीटरच्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. जनरल च्यो झांगकी हे सध्या चीनच्या पश्चिम थिएटर कमांडचे प्रमुख आहेत. वाचा: वाचा: दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सध्या सुरू असलेला लष्करी तणाव निवळवण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान आज (शनिवारी) लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांदरम्यान वाटाघाटी होणार आहेत. लेहस्थित चौदाव्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग भारतीय तुकडीचे नेतृत्व करतील. चीनच्या तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करतील. माल्डो येथील सीमास्थित अधिकारी भेट स्थळावर या वाटाघाटी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये २०१८ साली झालेल्या अनौपचारिक परिषदेतील वाटाघाटींमध्ये ठरलेल्या व्यूहात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा आग्रह भारताकडून धरला जाईल. चीनच्या दबावाला भीक न घालता सीमा क्षेत्रात पायाभूत सुविधा सुरूच ठेवण्याचा निर्धार भारताने केल्याचे समजते.