चेन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आणि बाहुबली सिनेमात शिवगामीची व्यक्तीरेखा साकारलेली अभिनेत्री सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे अडचणीत सापडली आहे. गुरवारी ११ जून रोजी तिच्या गाडीतून १०० हून जास्त दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाटल्या जप्त केल्यानंतर पोलिसांनी रम्याच्या गाडीचा चालक सेल्वाकुमारला अटक केली आहे. तपासणीवेळी गाडीत होती रम्या रिपोर्टनुसार, ज्यावेळी पोलीस रम्याच्या गाडीचा तपास करत होते. तेव्हा रम्या गाडीतच होती. चेकपोस्टवर सर्वांच्या गाड्या तपासल्या जात होत्या. तेव्हा रम्या यांची टोयोटा इनोवा गाडी थांबवण्यात आली. आतापर्यंत एवढंच कळलं की, रम्या यांनी पोलीस चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलं आहे. पोलिसांना रम्याच्या गाडीत दारू आणि बिअरच्या बाटल्या मिळाल्या. लॉकडाउनमध्ये चेन्नईत दारूवर बंदी आहे लॉकडाउननंतर चेन्नईमध्ये दारू विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दारूची दुकानं बंद असून शहरात दारूविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असं म्हटलं जात आहे की, रम्याच्या चालकाला जमानतीवर सोडण्यात आले आहे. या प्रकरणी रम्याकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेन्ट आलेलं नाही. चेन्नईत दारूची दुकानं उघडण्यावर बंदी असल्यामुळे अनेकजण बाहेरच्या जिल्ह्यांमधून लपून दारू विकत घेत आहेत.