
वॉशिंग्टन: कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आगडोंब उसळला आहे. अनेक शहरांमध्ये जाळपोळ, दंगल आणि लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. आंदोलनाची धग राजधानी वॉशिंग्टन डीसी आणि व्हाइट हाउसपर्यंत पोहचली असून हिंसाचार रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिकेतील जवळपास ४० शहरांमध्ये वर्णद्वेषी आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जॉर्ज फ्लाइडच्या हत्येच्या घटनेमुळे अमेरिका दुखी असून त्यांच्या मनात रोष आहे. जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष म्हणून देश आणि नागरीकांच्या हितांचे संरक्षण करणे ही माझी प्राथमिकता असल्याचेही त्यांनी सांगितले. वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या हिंसक घटनांमुळे मी दुखी आहे. दंगलखोरांना रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. वाचा: ट्रम्प यांनी राज्यांनाही हिंसाचार रोखण्याचे निर्देश दिले. हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यांनी पूर्ण प्रयत्न करावे. जर एखादे राज्य हिंसाचार रोखण्यास असमर्थ ठरल्यास अमेरिकन लष्कराला त्या ठिकाणी तात्काळ पाठवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जॉर्जच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये नाराजी आहे. मात्र, दंगलखोरांमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आणखी वाचा: