तीन महिन्यानंतर सलून सुरू; ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगनंतरच दुकानात प्रवेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 28, 2020

तीन महिन्यानंतर सलून सुरू; ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगनंतरच दुकानात प्रवेश

https://ift.tt/2BOLqbq
मुंबई: राज्यभरातील आज अखेर सुरू झाले आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतानाच ग्राहकांचे करूनच त्यांना सलूनमध्ये प्रवेश दिला जात आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून अनेक सलून बाहेर ग्राहकांना ठरावीक अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने कटिंग करण्यासाठी अनेक सलूनबाहेर ग्राहकांची गर्दी दिसत होती. ( reopen ) आजपासून सलून सुरू झाल्याने करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सलून चालकांनीही बरीच खबरदारी घेतल्याचं दिसून येतं. आज सलून सुरू होणार म्हणून सलून चालकांनी सलूनची साफसफाई करून निर्जंतुकीकरण केलं आहे. अनेक सलूनमध्ये तिथले कर्मचारी तोंडाला मास्क, अॅप्रन आणि हातात ग्लोव्हज घालून ग्राहकांची कटिंग करताना दिसत होते. शिवाय सलूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या शरीरातील तापमान थर्मल स्कॅनिंगने तपासूनच त्याला आत प्रवेश दिला जात आहे. ग्राहकांना सॅनिटाइजही केलं जात आहे. प्रत्येक दुकानात सॅनिटायजेशन ठेवण्यात आलं आहे. अनेक सलून छोटे असल्याने ग्राहकांना बाहेरच थांबवले जात असून काही ठिकाणी ग्राहकांना नंबर देऊन ठरावीक वेळेत दुकानात बोलावले जात आहे. ज्या ग्राहकांना सर्दी, ताप, खोकला असेल अशा ग्राहकांची कटिंग केली जात नाही. काही फोन करून दुकानात येण्याची वेळ घेतात. त्यांना आधी ताप, सर्दी, खोकला किंवा त्वचेशी संबंधित विकार आहेत का? हे विचारलं जातं. त्यानंतरच त्यांना वेळ दिली जाते. वरीलपैकी एकही लक्षण असेल तर ग्राहकांना वेळ दिली जात नाही, असं एका सलून चालकांनी सांगितलं. झोपडपट्टी परिसरातही सलून सुरू झालं आहे. तिथेही दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी पाह्यला मिळाली. मात्र, या ठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे.