वॉशिंग्टन: जगभराता हाहाकार माजवणाऱ्या संसर्गाचा जोर ओसरण्याची चिन्हं दिसत नाही. जगभरातील जवळपास २०० हून अधिक देशांमध्ये फैलावला असून बाधितांच्या संख्येने एक कोटीचा आकडा ओलांडला आहे. अनेक देशांमध्ये विशेषत: आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये करोनाची पहिल्या लाटेचा जोर अद्यापही सुरू झाला नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आगामी दिवसांत करोनाबाधितांची संख्या वाढणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वीच करोनाबाधितांची संख्या एका आठवड्यात एक कोटी होणार असल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली होती. चीनमधील वुहान शहरात डिसेंबर २०१९ च्या अखेरीस करोनाबाधित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चीनमध्ये करोनाचा संसर्ग वेगाने फैलावला. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी ८० हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील पाच लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ५४ लाखांहून अधिकजणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. वाचा: अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित असून जवळपास २६ लाख जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, एक लाख २८ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्येही करोनाचा संसर्ग वाढत आहे. ब्राझीलमध्ये १३ लाख, १५ हजारांना बाधा झाली असून ५७ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. रशियात सहा लाख २७ हजार करोनाचे रुग्ण असून ८९०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सर्वाधिक करोनाबाधितांच्या संख्येत भारत चौथ्या स्थानी असून ५ लाख २९ हजार जणांना संसर्गाची लागण झाली आहे. भारतात १६ हजार १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा: वाचा: करोना संसर्गाचे केंद्र आता दक्षिण अमेरिका झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याशिवाय आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये करोनाचा संसर्ग अधिक वाढणार असल्याचा इशारा याआधी जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. काही मोजक्याच देशांमध्ये करोनावर जवळपास संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तर, सुमारे ८१ देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असल्याची चर्चा परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात करोनाचा जोर ओसरला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मे आणि जून महिन्यात करोनाचे जवळपास ६७ टक्के रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत सरासरी एक लाख नवीन करोनाबाधित आढळत आहेत. आणखी वाचा:
https://ift.tt/3ibcMZZ