
मुंबई : भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात उद्भवलेल्या संघर्षामुळे द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनांचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारातून आणि विदेशी बाजारांतून येणाऱ्या संकेतांवरही बाजाराची आगामी दिशा ठरण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी वाहन उद्योगातील कंपन्यांच्या विक्रीचे आकडे येण्यास सुरुवात होईल. येत्या बुधवारी (एक जुलै) जून महिन्याच्या मार्किट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे आकडेही जारी होतील. त्यानंतर मार्किट सर्व्हिसेस पीएमआयचे आकडे आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी जारी होतील. या आकड्यांचाही बाजाराच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मंगळवारी देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपनी ओएनजीसी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे निकाल सादर करणार आहे. तिकडे चीनमध्ये जून महिन्यातील एनबीएस मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे आकडेही मंगळवारी जारी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील मार्किट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे जूनमधील आकडे बुधवारी सादर होणार आहेत. अमेरिकेतील बिगरकृषी क्षेत्रातील जून महिन्यातील रोजगाराचे आकडे आगामी आठवड्यात गुरुवारी जारी होणार आहेत. या आकड्यांव्यतिरिक्त विविध प्रकारचे विदेशातील आकडे जारी होणार असून, त्यांचा परिणाम जागतिक बाजारांवर दिसून येण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशात एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी एकूण १६ हजार ४७५ रुग्णांचा झाला मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये आढळले करोनाचे १९,४५९ नवे रुग्ण आढळून आले. मागील २४ तासांत झाला एकूण ३८० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जागतिक पातळीवर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम म्हणून जगभरच्या शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय बाजारांवरही जाणवला. सत्रांतर्गत व्यवहारांच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक () २०९.७५ अंकांनी घसरून ३४,९६१.५२च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ७०.६० अंकांनी घसरून १०,३१२.४०च्या पातळीवर स्थिरावला होता.