
मुंबई : जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीला मंगळवारी पुन्हा एकदा ब्रेक लागला. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. याआधी गेल्या रविवारी कंपन्यांनी इंधन दर 'जैसे थे'च ठेवले होते. दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ असून डिझेल दर ७८.८३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये झाले आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत कोणतीही वाढ झाली नाही. लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि वाढवण्यास सुरुवात केली होती. ७ जूनपासून कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. मागील २३ पैकी २२ दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. या दरवाढीने दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या तुलनेत डिझेल महाग झाले. डिझेलचा भाव ८० रुपयांवर गेला. तर मुंबईत पेट्रोल ९० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. सातत्याने सुरु असलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी देशभरात आंदोलन केले. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईविरोधात नेटिझन्सनेही केंद्र सरकारवर टीका केली होती. २०१४ पूर्वी भाजपने इंधन दरवाढी विरोधातील व्हिडीओ, नेत्यांची भाषणे पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर मेमेज तुफान व्हायरल झाले होते. वाचा : व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली आहे. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो. यापूर्वी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक ७५.६९ रुपये होता. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी उच्चांकी ८४ रुपये राहिला होता.