
राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ चाचण्याही करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये किती लोकांना संसर्ग झाला, याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. या चाचण्यांचे दरही माफक असतील. त्यामुळे अधिकाधिक संख्येने त्या करता येतील. जगभर करोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. करोना व्हायरसने अमेरिकेत उच्छाद मांडला आहे. त्यातच बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. या घडामोडी आज आशियातील भांडवली बाजारांवर परिणाम करतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. करोना संसर्गाची धास्ती घेतल्यामुळे प्रत्येक आजार हा करोना असल्याचा गैरसमज सामान्यांच्या मनामध्ये गडद आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्येही अनेकदा इतर आजारांच्या रुग्णांना नाकारले जाते. श्वसननलिकेमध्ये शेंगदाणा अडकल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या दोन वर्षाच्या बाळाचे प्राण केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले. राज्यातील घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून, तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑगस्टमध्ये नियोजित आहे. मात्र, हे विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.