'उरी'चा डायलॉग वापरणं पोलिसांना पडलं महाग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 9, 2020

'उरी'चा डायलॉग वापरणं पोलिसांना पडलं महाग

https://ift.tt/3f8mZnF
मुंबई- लॉकडाउनमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या काळात पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याबद्दल सारेच त्यांचं कौतुक करत आहेत. याशिवाय मुंबई पोलीस ट्विटरवर जनजागृतीसाठी आकर्षक ट्वीट करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. नुकतंच त्यांनी विकी कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाशी निगडीत एक ट्वीट केलं. या ट्वीटचीही सध्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या सिनेमातील फक्त डायलॉगचाच त्यांनी वापर केला नाही तर सिनेमातील एक फोटोही त्यांनी वापरला. ? या डायलॉगची खूप चर्चा झाली होती. याच संवादाची मदत घेत मुंबई पोलिसांनी लोकांना अंतर ठेवून राहण्याची माहिती देताना How’s the distance.. ६ फीट.. असं ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी आणि त्याच्या मागील अधिकाऱ्याच्या तोंडावर मास्क लावलेलं दाखवलं. मुंबई पोलिसांची ही क्रिएटिव्हिटी युझर्सना फारशी आवडली नाही. काहींनी ६ फूटाचं अंतर हे ३० आणि ३१ फेब्रुवारीलाच शक्य असल्याचं सांगितलं. तर फॉटोशॉपवाले मास्क आजारांपासून वाचवू शकत नसल्याचं सांगितलं. एका युझरने लिहिले की, 'नालासोपारा येथे बस स्टँडवर जी रांग लागते त्यातलं अंतर ६ फूटचं नसतं.' याशिवाय मरीन ड्राइव्हचा जॉगिंग करणाऱ्यांचा फोटो शेअर करत एकाने हे ६ फूट आहे का असा प्रश्न विचारला. तसंच मुंबईतील गर्दीचा फोटो शेअर युझरने लिहिले की, जर हे ६ फूट अंतर असेल तर मुंबई आणि इथे राहणाऱ्यांना फक्त देवच वाचवू शकतो.