
बीजिंग: करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असतानाच चीनमध्ये आणखी एक सापडला आहे. या विषाणूमुळे करोनासारखी महासाथ पसरण्याचा धोका आहे. नुकत्याच एका संशोधनात हा विषाणू आढळला आहे. डुक्करामध्ये आढळलेला हा विषाणूचा मानवाच्या शरीरातही पसरू शकतो अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. संशोधकांनी हा विषाणू G4 EA H1N1 असल्याचे म्हटले आहे. हा विषाणू सहजपणे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये फैलावू शकतो. यामुळे आजाराची महासाथ येण्याचा धोका आहे. त्यामुळे संशोधकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मानवाला बाधित करण्यासाठी तापाच्या या विषाणूमध्ये सर्वच प्रकारची लक्षणे आहेत. या विषाणूववर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. विषाणू नवीन असल्यामुळे मानवात याचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती कमी असण्याचीही शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. वाचा: वाचा: करोनाचे थैमान अद्याप संपले नसताना आणखी एका घातक विषाणूचा शोध समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरात २००९ मध्ये स्वाइन फ्लू ही तापाची शेवटची साथ आली होती. स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी वयस्करांमध्येही पुरेशी रोगप्रतिकार शक्ती होती. हा A/H1N1pdm09विषाणू आता दरवर्षी देण्यात येणाऱ्या तापाच्या लसीमध्ये येतो. चीनमध्ये आढळलेला विषाणू हा स्वाइन फ्लूसारखाच आहे. मात्र, त्यात बदल दिसून आले आहेत. या विषाणूचा सध्या तरी काही धोका नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. वाचा: G4 EA H1N1 या विषाणूमध्ये आपली वाढ करण्याची क्षमता आहे. सध्या तापावर असलेली लस या विषाणूचा सामना करण्यास सक्षम नाही. प्रा. किम जो चांग यांनी सांगितले की, आपल्यासमोर सध्या करोनाचे संकट असले तरी भविष्यातील संकटाकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. त्यामुळे संभाव्य धोकादायक विषाणूंचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या विषाणूंपासून आपल्याला धोका नाही. मात्र, डुक्करांमध्ये हा विषाणू आढळल्यामुळे त्यांच्या शरीरातच विषाणूला रोखण्याचा प्रयत्न करायला हवा असेही त्यांनी सांगितले. करोनापेक्षाही अधिक घातक विषाणू प्राण्यांमध्ये असल्याचा इशारा याआधीच संशोधकांनी दिला होता. वटवाघळांसारख्या जंगली प्राण्यांमध्ये करोनासारखे आणि त्याहीपेक्षा अधिक घातक, धोकादायक विषाणू अस्तित्वात आहेत. या विषाणूंचा वेळेतच शोध घेऊन प्रतिबंध उपाय न आखल्यास जगाला पुन्हा एकदा महासाथीच्या आजाराला सामोरे जावे लागू शकते अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली होती.