सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत वाढदिवस; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात गुन्हा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 14, 2020

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत वाढदिवस; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात गुन्हा

https://ift.tt/3fpmt4u
नगर: करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रतिनिधींनी आपले वाढदिवस साधेपणाने साजरे केले. पक्षाचे कार्यक्रमही साधपणाने होत आहेत. लोकांना मदत करण्यावर लोकप्रतिनिधींचा भर आहे, अशा परिस्थिती राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी गर्दी जमवून दणक्यात वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करीत असताना त्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही करोना प्रतिबंधक उपाय योजनाकडे दुर्लक्ष केले. वाढदिवसाच्या दिवशी गर्दी जमवल्याप्रकरणी आणि मास्क न लावल्याने जगताप यांच्यासह त्यांच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. आमदार जगताप यांचे निवासस्थान असलेल्या भागातही फैलाव वाढल्याने तेथे कंटेन्मेंट झोन करण्याची वेळ आली होती. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधींनी नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा बनून प्रतिबंधात्मक उपाय व मदत कार्य यावर भर देणे अपेक्षित असताना स्वतः आमदारच नियम मोडत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. नियम मोडल्याने व्यापारी किंवा सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई होते, मात्र काही विशेष लोकांकडे दुर्लक्ष केले जाते, असे तक्रार शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. अखेर दोन दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आमदारांनी कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते तर कार्यकर्ते प्रेमापोटी भेटीला आले होते, असा दावा आता आमदार जगताप यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.