नवी दिल्लीः संरक्षणमंत्री यांनी काँग्रेस नेते यांच्या ट्वीटला ऊर्दू शायरीचा आधार घेत प्रत्युत्तर दिले आहे. यावर राहुल गांधी यांनी पलटवार करत पुन्हा एकदा सवाल केला आहे. राहुल यांनी राजनाथ सिंग यांनाभारत-चीन सीमा वादावर प्रश्न केला आहे. संरक्षण मंत्र्यांचे हाताच्या प्रतीकावर भाष्य करून झाले असेल, तर ते चीनने लडाखमध्ये भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे का, याचे उत्तर देतील का?, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे. भारत आणि चीनने लष्कर आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेच्या माध्यमातून सीमा विवाद सोडविण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, प्रत्येकाला 'सीमे'चे वास्तव माहीत आहे पण, मन प्रसन्न ठेवण्यासाठी 'शाह-याद' ही कल्पना चांगली आहे. (सब को मालूम हैं सीमा की हकीकत लेकिन... दिल के खुश रखने को, 'शाह-यद' ये खयाल अच्छा है)