'गरीब करोनाबाधितांवर मोफत उपचार करा, अन्यथा कारवाई' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 6, 2020

'गरीब करोनाबाधितांवर मोफत उपचार करा, अन्यथा कारवाई'

https://ift.tt/2XAX9Ta
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे केजरीवाल सरकारचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या आरोग्य विभागाच्या महासंचालकांनी () राजधानी दिल्लीतील ४२ खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी बेडची उपलब्धता किती आहे, याची विचारणाही करण्यात आली आहे. डीजीएचएसने तीन दिवसांत या आदेशाचे पालन करावेस असे सांगण्यात आहे आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयाविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी, दिल्ली सरकारने ५० पेक्षा जास्त बेड असलेल्या सर्व खाजगी रुग्णालयांना कोविडच्या उपचारासाठी त्यांच्या केंद्रात 20% बेड वापरण्यास सांगितले आहे. ४२ रुग्णालयांची यादी जाहीर डीजीएचएसने जारी केलेल्या आदेशात ४२ रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ईडब्ल्यूएस कोट्याअंतर्गत येणाऱ्या आरक्षित बेडची संख्या देखील नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही, तर रुग्णालयात पोहोचल्यानंतर एका तासाच्या आत रुग्णावर उपचार करणे आवश्यक आहे असे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत. यानंतर, रुग्णाच्या स्थितीनुसार त्याची भरती करण्याचा निर्णय डॉक्टरांना तातडीने घ्यायचा आहे. जर रुग्णालयात बेड किंवा व्हेंटिलेटर मोकळे नसेल तर रूग्णाला दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी देखील रुग्णालयाची असेल. सौम्य लक्षणे आढळल्यास रुग्णाला घरात क्वारंटीन किंवा कोविड केअर सेंटरकडे पाठवणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला प्रतीक्षा क्षेत्रात तीन तासांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागणार नाही, याची काळजीही रुग्णालयांना घ्यावी लागणार आहे. सकाळी चहा, न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, रात्रीचे भोजन आणि दिवसातून दोनदा फळे देणे इस्पितळात दाखल झालेल्या रूग्णांसाठी आवश्यक आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तणाव दिल्लीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा १,३३० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. दिल्लीत २८ मे ते ५ जून दरम्यान गेल्या नऊ दिवसांत आतापर्यंत ११,०७८ रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर दिल्लीत आणखी एक समस्या समोर आली आहे. ती म्हणजे दिल्लीतील रुग्णांचा बरे होण्याचा दरही खाली घसरलेला आहे. मागील ११ दिवसांत रुग्ण बरे होण्याचा दर ३९.६० टक्क्यांवर घसरला आहे.