वाचा: आजच्या ठळक बातम्या मोजक्या शब्दांत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 30, 2020

वाचा: आजच्या ठळक बातम्या मोजक्या शब्दांत

https://ift.tt/38dZ7wH
मुंबई : जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीला मंगळवारी पुन्हा एकदा ब्रेक लागला. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. याआधी गेल्या रविवारी कंपन्यांनी इंधन दर 'जैसे थे'च ठेवले होते. नवी दिल्लीः भारत सरकारने ५० हून अधिक चीनी अॅप्स बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सच्या यादीत प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. यात , आणि ShareIt यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सवर बंदी घालण्यामागे केवळ हे अॅप्स चीनी अॅप्स आहेत. म्हणून त्यांच्यावर बंदीवर घातली नाही. देशाची सुरक्षा आणि एकता राखून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे लवकरच ५९ अॅप्स गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवरून हटवण्यात येतील. मुंबई : मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतींत वाढ झाली होती. हीच तेजी या आठवड्यात कायम राहणार असून सोने विक्रमी स्तर गाठेल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. देशातील कमॉडिटी बाजारात सोमवारी सोन्यावर दबाव दिसून आला. सोन्याच्या दरात ०.१३ टक्के घसरण झाली. मात्र सोन्याचा भाव ४८००० वर कायम आहे. सोने ४८२४४ रुपयांवर बंद झाले. ०.५० टक्क्याने कमी झाला आणि ४८१२३ रुपयांवर बंद झाला. दरम्यान मुंबईत सराफा बाजारात सोने ४९ रुपयांनी वधारले. सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅमला ४८४५० रुपये झाला. तर चांदीचा भाव ४८५०० रुपये प्रती किलो होता. नवी दिल्लीः केंद्र सरकारने अनलॉक- २ साठी आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ३१ जुलैपर्यंत शाळा-कॉलेजेस बंदच राहणार आहेत. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण संस्था आता जुलैनंतरच उघडणार आहेत. हैदराबादः देशात करोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा स्थितीत एक चांगली बातमी आहे. भारतात करोनावरील लस तयार झाली आहे. भारत बायोटेकने ही लस बनवली आहे. यातील आनंदाची बाब म्हणजे या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय ) दिली आहे. मुंबई: 'देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करून पालख्या नेत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. मागील आठ शतकांपासून चालत आलेली ही परंपरा खंडित होऊ देऊ नये आणि करोनाचे संकट असले, तरी सुरक्षित वावरचे सर्व नियम पाळून अवघ्या १०० वारकऱ्यांना वाखरी ते पंढरपूर हा केवळ सहा कि.मी.चा प्रवास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत करण्यास परवानगी द्यावी', असे आर्जव करत वारकऱ्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.